सुरक्षिततेसाठी करा
फसवणूक टाळण्यासाठी करू नका
लोकपाल अधिकारी - श्री. नरेंद्र लहू आयरे
संपर्क- ९४२३२९७०९७
ईमेल - gro@dapoliurbanbank.com
KYC कागदपत्रे पुन्हा अद्ययावत करण्याबाबत (Re-KYC)
बँकेच्या सर्व खातेदारांना कळविण्यात येते की, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बँकांना आपल्या खातेदारांची अद्ययावत KYC (Updated) कागदपत्रे प्राप्त करणे बंधनकारक आहे. तसेच Prevention of Money Laundering Act 2002 च्या तरतुदीनुसार ग्राहकांना देखील KYC कागदपत्रे बँकेस वेळोवेळी देणे बंधनकारक आहे. तरी ग्राहकांनी पुनःश्च KYC कागदपत्रे त्वरीत सादर करून बँकेस सहकार्य करावे. बचत व चालु खात्यावर मागील 2 वर्ष व्यवहार झाले नसल्यास सदर खाती Inoperative मध्ये व 10 वर्ष व्यवहार झाले नसल्यास DEAF (Depositor Education and Awareness Fund) मध्ये वर्ग करावी लागतात. काही कारणांनी खात्यावर व्यवहार झाले नसल्यास आपली अद्ययावत KYC पूर्तता लवकरात लवकर करून खात्यावरील व्यवहार पुन्हा सुरू करण्यात यावेत.
KYC साठी आवश्यक कागदपत्रे - आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन चालवण्याचा परवाना, मनरेगा ओळखपत्र, एन. पी. आर. ओळखपत्र (यापैकी कोणतेही 1) तसेच 2 फोटो, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक व ई-मेल इत्यादी
अधिक माहितीसाठी ग्राहकांनी आपल्या शाखेशी त्वरित संपर्क साधून वरीलप्रमाणे पूर्तता करावी, ही विनंती.आहे.